

भोसरी, ता. १ : भोसरी परिसरातील प्रभाग क्रमांक सातमधील अंतर्गत रस्ते त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाचमधील सखुबाई गवळी उद्यान शेजारील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र, त्यावरील पावसाळी आणि सांडपाणी वाहिनीच्या गटारांची झाकणे काही ठिकाणी खचली आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याच्या वर आली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना दुखापतींना सामोरे जावे लागत आहे.
लांडेवाडी ते चांदणी चौकाला जोडणाऱ्या रस्त्यावर असलेले पावसाळी चेंबर वारंवार नादुरुस्त होत आहे. या रस्त्यावर पीएमपी बससह इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. जड वाहने गेल्यावर गटाराचे झाकण खाली खचत आहे. हा प्रकार वारंवार होत असतानाही येथे चांगल्या प्रकारची झाकणे लावणे महापालिकेला अद्यापपर्यंत जमले नाही.
भोसरीतील प्रभाग क्रमांक पाचमधील कै. सखूबाई गवळी उद्यानालगत आळंदी रस्ता ते दिघी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यावरही बसविण्यात आलेल्या चेंबरची झाकणे नादुरुस्त झाल्याने या रस्त्यावर चेंबरचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे. याविषयी महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
लांडेवाडीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील खचलेल्या झाकणामुळे वाहने त्यात अडकतात. काही वेळेस दुचाकी घसरण्याचे प्रकार होत असल्यामुळे वाहन चालकांना दुखापत होत आहे. महापालिकेने चेंबरची कायमस्वरूपी दुरुस्ती केली पाहिजे.
- रुपेश तांगडे, वाहन चालक
लांडेवाडीतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची पाहणी करण्यात येईल. नादुरुस्त पावसाळी गटाराच्या चेंबरची दुरुस्ती करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्याची झाकणे खचणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येईल.
- अतुल पाटील, ल क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.