बाणेरमधील आरोग्य केंद्र सलाईनवर

बाणेरमधील आरोग्य केंद्र सलाईनवर

Published on

बालेवाडी, ता. ३ ः बाणेर येथे पुणे स्मार्ट सिटीकडून मोफत आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. परंतु सध्या या आरोग्य केंद्राची अवस्था बिकट झालेली आहे. हे आरोग्य केंद्र कंटेनरमध्ये सुरू करण्यात आले होते. सध्या हा कंटेनर गंजला असून अनेक ठिकाणी छताची पीओपी खाली पडत आहे. पावसाचे पाणी गळते. स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. पिण्याचे पाणी नाही, उंदीर, घुशी, सापांचा सर्रास वावर असतो. अशा अनेक समस्यांनी या आरोग्य केंद्राला घेरले आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
बाणेर-महाळुंगे रस्ता येथे स्मार्ट सिटीकडून आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. हे या भागातील पहिलेच आरोग्य केंद्र असल्यामुळे या आरोग्य केंद्रास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला त्याचबरोबर गरोदर महिला तपासणी, लहान मुलांचे लसीकरण हे रुग्ण येथे सेवेचा लाभ घेतात. कंटेनरमध्ये बसवलेले पीओपीचे आच्छादन नागरिकांच्या अंगावर पडत आहे. पावसाळ्यात कंटेनरच्या छतावरून पाणी आत येते. स्वच्छतागृहाच्या फरशा खचल्या आहेत, इथे पाणीही नाही. पिण्याचे पाणी आहे पण टाक्या गेल्या कित्येक वर्षात साफ केल्या नसल्यामुळे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. आरोग्य केंद्राच्या मागे गवत वाढले असून अडगळीमुळे येथे मोठ्या प्रमाणात उंदीर, घुशी, सापांचा वावर आहे. उंदरांनी आरोग्य केंद्रातील साहित्याचे बरेच नुकसान केले आहे. अशा एक नाही तर अनेक समस्यांच्या समस्यांच्या गर्तेत हे आरोग्य केंद्र असून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

बाणेर येथील आरोग्य केंद्राचा फायदा आम्हाला रुग्णांना नेहमीच होतो. इथे नेहमीच गर्दी असते. परंतु या ठिकाणी उंदीर फिरताना दिसतात, पाण्याची सोय नाही, फॅन बंद असतात. कंटेनर गंजला असून पीओपी अंगावर पडत आहे. या आरोग्य केंद्राची दुरुस्ती करावी किंवा इथे नवीन आरोग्य केंद्र बांधण्यात यावे.
-मयूरी जाधव, बाणेर

साधारण पंधरा दिवसांपूर्वीच आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे येथे पाहणी करून गेल्या असून वरिष्ठांना याबद्दल कळविण्यात आले आहे.
याबद्दल लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.
-डॉ. गणेश डमाळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com