

चऱ्होली, ता. १९ : लाल बहादूर शास्त्री भाजी मार्केट पिंपरी व उद्योजक अजय तापकीर मित्रपरिवार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम व रक्तदान शिबिर घेण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्याचबरोबर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचेही पूजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन अजय तापकीर मित्र परिवारच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी पिंपरी सेरेलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर यांनी सहकार्य केले. साधारण ५० युवकांनी यावेळी रक्तदान केले.
यावेळी अनिकेत तापकीर, उद्योजक अजय तापकीर, कुणाल साठे, विजय तापकीर आदी उपस्थित होते.
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त वंदन करताना मान्यवर.
फोटोः 00121
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.