चऱ्होलीच्या नावावर 
पोस्ट विभागाची ‘मोहोर’
‘चऱ्होली उप डाकघर’चे उद्‍घाटन मोहर

चऱ्होलीच्या नावावर पोस्ट विभागाची ‘मोहोर’ ‘चऱ्होली उप डाकघर’चे उद्‍घाटन मोहर

Published on

चऱ्होली, ता. ९ : आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी रामचंद्र जायभाये, तसेच पुणे ग्रामीण पोस्ट विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे आदी मान्यवरांच्या हस्ते चऱ्होलीची नवीन ओळख म्हणून ‘चऱ्होली उप डाकघर ४११०८१’ या पिनकोडसह नवीन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
चऱ्होलीला नवीन नावलौकिक मिळवण्याच्या दृष्टीने २०२२ पासून ‘उप डाकघर’ साठी केलेला पाठपुरावा, परिसराचा होत असलेला कायापालट, पायाभूत सुविधा तसेच परिसरातील विकासाभिमुख राबविण्यात आलेले प्रकल्प यावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी पुणे पोस्ट ऑफिसचे विभागीय अधिकारी जायभाये यांनी येथील वाढत असलेली लोकसंख्या विचारात घेता योग्य संख्येने कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन दिले. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली. यावेळी पुणे परिमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह युवा नेते माजी नगरसेवक सचिन तापकीर, अजित बुर्डे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, अरूण काळजे, अनिकेत तापकीर, सुरेश तापकीर आणि चऱ्होली ग्रामस्थ उपस्थित होते.


फोटोः ००१४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com