महिला दिनानिमित्त ‘आदर्श महिला रणरागिणी’ पुरस्कार प्रदान

महिला दिनानिमित्त ‘आदर्श महिला रणरागिणी’ पुरस्कार प्रदान

Published on

चिंचवड स्टेशन, ता. १० ः जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पर्यावरण संरक्षण आणि समाज परिवर्तनासाठी कार्य करत असलेल्या महिलांची मुलाखत घेऊन, त्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. महिला आरोग्य, सक्षमीकरणासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जाईल, त्यासाठी महिलांनी बोलके होऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष देवा तांबे यांनी केले.
यावेळी उपस्थित महिलांनी महिला दिनानिमित्त चारोळ्या, कविता सादर केल्या.
संस्थेच्या वतीने अंजू सोनवणे, अनघा दिवाकर, मनिषा कलशेट्टी, संगीता शिंदे गव्हाणे, धनश्री नरुटे, शिवांजली गिरंजे, नेहा दुग्गल, प्रीती बडवे, स्नेहा तांबे, आर्या गिरंजे आदी महिलांचा राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. तसेच सर्व महिलांना तुळशीचे रोप भेट देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com