राडारोडा पडून असल्याने अपघाताचा धोका

राडारोडा पडून असल्याने अपघाताचा धोका

Published on

राडारोडा पडून असल्याने अपघाताचा धोका

चिंचवड, ता.२५ : इंदिरानगर भागात सांडपाण्याच्या चेंबरच्या दुरुस्ती करण्यात आली. या दरम्यानचा राडारोडा महिनाभरापासून रस्त्याकडेला पडून आहे. येथून दुचाकी घसरून अपघात होण्याचा आहे. काही चेंबरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे व अजून काही चेंबर बाकी आहेत. या कामात निघालेली खडी, माती व राडारोडा हटवण्याची जबाबदारी प्रशासन किंवा ठेकेदाराने घेतलेली नाही. त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसत आहे. स्थानिक रहिवाशी विश्वनाथ धनवे यांनी या परिस्थितीची दखल घ्यावी. तसेच, भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी केली आहे. याबाबत विचारणा केली असता, ‘‘संबंधित ठिकाणचा राडारोडा लवकरच उचलला जाईल,’’ असे आश्वासन ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय उपअभियंता दीपक करपे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com