विद्यार्थ्यांकडून नियमांचे पालन; मात्र चालकांकडून उल्लंघन !

विद्यार्थ्यांकडून नियमांचे पालन; मात्र चालकांकडून उल्लंघन !
Published on

चिंचवड, ता.२७ ः पुणे - मुंबई महामार्गावरील आकुर्डीतील खंडोबामाळ चौकामध्ये शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नियमांचे पालन करत असताना दुसरीकडे पीएमपी, खासगी वाहने आणि रिक्षाचालकांकडून सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. पादचारी, वाहनचालक तसेच विद्यार्थ्यांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
चिंचवड स्थानकाजवळील लोकमान्य हॉस्पिटलजवळील उड्डाणपूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकातून वळविण्यात आली आहे. मात्र हा चौक शालेय विद्यार्थ्यांसह इतर पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनत चालला आहे. तर चिंचवडकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी हा चौक मोठ्या अडचणींचा ठरला आहे. त्यातच पीएमपी बसचालकांचे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत आहे. त्यांच्या चुकीमुळे निगडी व खंडोबा मंदिराकडून चिंचवडकडे जाणाऱ्या वाहनांना जागा मिळत नाही. खंडोबामाळ चौकामधून चिंचवडकडे जाणारे व येणारे रस्ते अरुंद आहेत. त्यातच पीएमपीचे चालक झेब्रा क्रॉसिंगच्यापुढे अर्ध्या रस्त्यावर बस उभ्या करतात. त्याने शाळकरी विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत आहे. झेब्रा क्रॉसिंगचा वापर करता न आल्याने विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून गर्दी व वाहतुकीतून मार्ग काढावा लागत आहे. त्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय निगडी व खंडोबा मंदिराकडून येणारी वाहने चौकात अडकून पडतात. परिणामी, वाहतूक वारंवार अर्धा-एक तास विस्कळीत होत आहे. वाहतूक विभागाने या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे आणि आकुर्डी चौकामध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, बस किंवा इतर वाहने रस्त्यावर उभी राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.

आकुर्डी चौकातील वाहतुकीबाबत वाहतूक अंमलदार यांना तशा सूचना दिल्या जातील. बस असो वा इतर कोणतेही वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वाहतूक अंमलदार यांना देण्यात येतील.
- विश्वजीत खुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com