जिवाजी महाले पुरस्कारांचे वितरण

जिवाजी महाले पुरस्कारांचे वितरण
Published on

चिंचवड, ता.१० ः शूरवीर जिवाजी महाले सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांना
शूरवीर जिवाजी महाले समाज भूषण पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. यानिमित्त राज्यस्तरीय फॅशन-सांस्कृतिक स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आनंद पिंपळकर (सामाजिक सेवा), ज्योती विद्या (वास्तुतज्ज्ञ), रामदास सूर्यवंशी, मिलिंद एकबोटे (सामाजिक कार्यकर्ता), रेखा निर्भय कुरुबंशी (समाजसेवा) आदी पुरस्कारांचेही वितरण झाले. जिवाजी महाले स्मारक समितीचे सचिव गणेश वाळुंजकर गिरी राजूरकर आणि सागर गायकवाड यांनी संयोजन केले. सागर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
CWD25A00798

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com