

चिंचवड, ता.९ ः चिंचवडमध्ये जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) च्या वतीने ‘विश्व नवकार महामंत्र जप दिवस’ मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील हजारो जैन बांधवांनी सहभाग घेतला. देशभरात ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन संवाद साधला.
चिंचवड येथील जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. प.पू. गौरव मुनीजी यांनी ‘नवकार है तो संस्कार है’ या वाक्यातून नवकार महामंत्राचा महिमा सांगितला. म.सा. प्रणिधीजी यांनी नवकार महामंत्रामुळे होणारे फायदे सांगितले. तसेच म.सा. पुण्यशीलाजी यांच्यासह साधू-साध्वी मंडळीनेही मार्गदर्शन केले. त्यानंतर दिल्ली ज्ञान भवनामधून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपण सर्व श्रोत्यांना दाखवण्यात आले.
नवकार महामंत्राच्या आध्यात्मिक शक्तीचा त्यांनी उल्लेख केला. हा मंत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामध्ये १०८ दिव्य गुण असून तो मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवत असल्याचे त्यांनी नमूद केले. भगवान महावीर जयंतीनिमित्त मोदींनी नागरिकांना पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, स्वदेशी वस्तूंचा वापर, सेंद्रिय शेतीचा प्रसार, साधे राहणीमान, आरोग्यदायी जीवनशैली आणि गरजूंना मदतीचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, झोन चेअरमन राजेंद्र जैन, श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया, जितोचे शहर अध्यक्ष आनंद मुथा, सचिव तुषार लुनावत, महिला अध्यक्ष पूनम बंब, युवा अध्यक्ष सौरभ बेदमुथा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
राखी बेदमुथा यांनी सूत्रसंचालन केले. सचिन धोका, हर्षद खिंवसरा, प्रीतम दोशी, हेमंत गुगळे, दिलीप नहार यांचे मोलाचे योगदान राहिले. आनंद मुथा यांनी स्वागत केले; तर तुषार लुनावत यांनी आभार मानले.
CWD25A00800
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.