श्री फत्तेचंद जैन विद्यालयात अभिवादन

श्री फत्तेचंद जैन विद्यालयात अभिवादन

Published on

चिंचवड ः श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात सरस्वती पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया, संजीव वाखारे, शिक्षक प्रतिनिधी ज्योती छाजेड व सुवर्णा गायकवाड आदी उपस्थित होते. प्राचार्या सुनीता नवले यांनी डॉ. आंबेडकर यांची ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांपुढे मांडून शिक्षणाचे व सामाजिक समतेचे महत्त्व पटवून दिले. तर शिक्षिका सुहासिनी घाडगे यांनी डॉ. आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट विविध प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. कल्पना गोरडे यांनी सूत्रसंचालन केले; तर पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com