गतिरोधकाचे काम, चार महिने थांब!

गतिरोधकाचे काम, चार महिने थांब!
Published on

चिंचवड, ता. २६ : चिंचवडगाव ते आकुर्डी भोईरनगर चौकात वाहने वेगाने येतात. या परिसरातील वर्दळ पाहता, गतिरोधक उभारण्याची मागणी नागरिक सातत्याने करत आहेत. पण, पालिका आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहेत असा आरोप अर्जदारांनी केला आहे.
भोईरनगर चौक परिसरातील इंदिरानगर कॉलनी रस्ता बिजलीनगरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाला मिळतो. या ठिकाणी जवळच हॉस्पिटल आणि अन्य दुकाने आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी चार महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थापत्य विभाग तसेच वाहतूक पोलिस यांना पत्र देत येथे गतिरोधक असावा, अशी मागणी केली होती. त्यावर दीड महिन्यापूर्वी वाहतूक विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून गतिरोधकाची आवश्यकता असल्याचे पत्र महानगरपालिका स्थापत्य विभागाला दिले. मात्र, त्यानंतरही येथे कामाला सुरुवात झालेली नाही.
या प्रकरणात महापालिका ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाने त्वरित पावले उचलून गतिरोधकाचे काम सुरू करावे, अशी मागणी या अर्जदारांनी केली आहे.

चिंचवडगावातून आकुर्डी चौकाकडे जाताना वाहने वेगाने येतात. त्यामुळे आम्हाला रस्ता ओलांडताना खूप भीती वाटते. यामुळे या ठिकाणी तातडीने गतिरोधक निर्माण करावा. यामुळे चौकात वाहनांचा वेग कमी होईल.
- सुनील देशमाने, स्थानिक रहिवासी.

गतिरोधक निर्माण करण्याबाबत ठेकेदाराशी बोलणे झाले आहे. कामाचे ठिकाणदेखील दाखवले आहे. पण, काही ठिकाणी पावसाळापूर्व कामे सुरू असल्यामुळे थोडा उशीर होत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत गतिरोधकाच्या कामाला सुरुवात होईल.
- राजकुमार सूर्यवंशी, स्थापत्य उपअभियंता, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com