

चिंचवड, ता.२५ ः आकुर्डी एसकेएफ कंपनीजवळील मुख्य रस्त्यावर असलेल्या चिंचवड वाहतूक पोलिस चौकी समोर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. तेथे डाव्या बाजूच्या रस्त्याचा स्तर खाली असल्यामुळे उतार तयार झाला असून खड्डा निर्माण झाला आहे. तसेच बाजूलाच राडारोडा देखील पडला आहे. परिणामी, पावसाचे पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
या रस्त्याच्या शेजारीच सांडपाण्याचा नाला आहे. मात्र योग्य त्या प्रकारे पावसाचे पाणी त्या नाल्यात सोडले जात नाही. काही ठिकाणी नाल्याच्या कठड्याला छिद्रे पाडण्यात आली आहेत. मात्र त्या छिद्रांमध्ये माती व दगड अडकलेले आहेत. त्यामुळे पाणी नाल्यात जाऊ शकत नाही. रस्त्यावर साचून राहत आहे. त्यामुळे त्या छिद्रांमधील गाळ किंवा अडकलेली घाण, राडारोडा काढणे गरजेचे आहे. जेणेकरून रस्त्यावरील पाण्याचा निचरा होऊ शकेल.
याशिवाय, कायमचा उपाय म्हणून रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह थेट नाल्यामध्ये जाण्यासाठी मोठी व रुंद वाहिनी दोन टाकता येऊ शकेल. त्यामुळे पावसाचे पाणी लवकर नाल्यात जाऊन वाहतुकीला होणारा पाण्याचा अडथळा कमी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.