सखाराम, सकुबाई, सोहम अन् साक्षीचे शेतातले झाड !

सखाराम, सकुबाई, सोहम अन् साक्षीचे शेतातले झाड !
Published on

चिंचवड, ता.१६ ः ‘जनरेशन झेड’ला पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक जाणीव करुन देण्याच्या उद्देशाने अंघोळीची गोळी या संस्थेने ‘सखाराम, सकुबाई, सोहम आणि साक्षीचे शेतातले झाड’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत रविवारी (ता.१५) मारुंजी येथील गोडांबेवाडी क्र.१ येथील शेतकरी सखाराम, अनुसया गोडांबे यांच्या शेतात १५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस विविध संस्था-संघटना वृक्षारोपण उपक्रम राबवत असतात. परंतु सर्वात सोपी गोष्ट म्हणजे झाड लावून त्याचा सेल्फी स्टेटसवर ठेवणे आणि परत त्या झाडाकडे ढुंकूनही न पाहणे. परंतु आंघोळीची गोळी या संस्थेच्या उपक्रमाचा उद्देश फक्त झाडे लावणे नाही; तर ती पुढील पाच वर्षे टिकवणे आणि शहरातील ‘जनरेशन झेड’ ला शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव करून देणे हा आहे. त्याअंतर्गत वरील उपक्रम राबविण्यात येत आहे. गोडांबेवाडीतील या उपक्रमात प्रेमलोक पार्क येथील नक्षत्रम एल सोसायटीच्या अध्यक्षा रुचिता बंडी, किरीट बंडी, श्रुती जैन, अपूर्वा चव्हाण, मेघा साळुंखे, सुरभी जैन, रूपाली पाटील, श्रावी जैन, अर्ना मांढरे, हिरकणी पाटील, सांची जैन आणि शेतकरी सुरेश गोडांबे यांनी सहभाग घेतला. यावर्षी दहा शेतकऱ्यांच्या शेतात विद्यार्थ्यांच्या पुढाकार प्रत्येकी २५ झाडे लावण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
बंडी म्हणाल्या, ‘‘सखाराम आणि सकुबाई हे शेतकऱ्यांचे तर सोहम आणि साक्षी हे नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे शेतावर लावलेले झाड. त्यांचे संगोपन शेतकरी व विद्यार्थ्यांनी करायचे आहे.’’
अंघोळीची गोळीचे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले, ‘‘शहरातील विविध महाविद्यालयातील एनएसएस विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सहभागी करून त्यांना झाडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जोडायचे आहे. हा उपक्रम केवळ झाड लावून फोटो काढण्यापुरता न राहता पर्यावरण आणि कृषी संस्कृती जपणारा एक प्रेरणादायी आदर्श ठरेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com