स्पॅको टेक्नॉलॉजिस पतसंस्थेची सभा
चिंचवड, ता.२४ : मोहननगर येथील स्पॅको टेक्नॉलॉजिस (इंडिया) लि.कंपनीच्या कामगार सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावर्षी सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी धनंजय सावंत होते. सचिव पाटोळे यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखविला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष जाधव, संचालक प्रवीण शिंदे, अजय शिर्के, संगमेश्वर शिवपुजे, युनियनचे माजी सरचिटणीस अनिल कवठेकर व बहुसंख्येने सभासद हजर होते. खजिनदार प्रभाकर चव्हाण यांनी आभार मानले. सभेत कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना शालेय साहित्य, मिठाई व रोपे भेट देण्यात आली. या पतसंस्थेचे ११० सभासद असून संस्थेची कर्जमर्यादा १२ लाख रुपये आहे.
CWD25A01330
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.