रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी चव्हाण
चिंचवड, ता.३ ः रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे मावळते अध्यक्ष गोविंद जगदाळे व सचिव सुभाष वाल्हेकर यांनी नवनियुक्त अध्यक्ष भरत चव्हाण व सचिव वसंत ढवळे यांच्याकडे पदभार सोपवला.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, गोविंद चितोडकर, राजाभाऊ चिंचवडे, मोहन पवार तसेच फर्स्ट लेडी कावेरी चव्हाण व राजश्री ढवळे यांची उपस्थिती होती. एक जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ असल्याने क्लबतर्फे त्रिवेणी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स तसेच वाल्हेकरवाडी परिसरातील डॉक्टरांना गुलाब पुष्प व प्रशस्तीपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर व इतर रोटरी क्लबच्या सदस्यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.