पालक-शिक्षक संघ जाहीर

पालक-शिक्षक संघ जाहीर

Published on

चिंचवड, ता. ५ ः श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या माध्यमिक विभागात पालक - शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीची सहविचार सभा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. संस्थेचे मानद सरचिटणीस राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या सुनीता नवले यांनी पालक - शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर केली. पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी शाळेतील उपक्रमांची सविस्तर माहिती दिली; तर पर्यवेक्षक संजीव वाखारे, पालक प्रतिनिधी सुहास शिंदे, स्वाती मिस्त्री यांनी शाळेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. उत्तम बिर्जे यांनी सूत्रसंचालन केले; पर्यवेक्षक राजेंद्र पितळिया आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com