‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष

‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष

Published on

‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष
चिंचवड ः आषाढी एकादशीनिमित्त भोईरनगरमधील जयवंत प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे पारंपरिक पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील शिशुवर्ग ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी विठ्ठल-रखुमाईच्या भक्तिमय जयघोषात सहभागी झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई मुंडे उपस्थित होत्या. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय राऊत, मुख्याध्यापिका (प्राथमिक) वंदना सावंत यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. या पालखीची इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगर आणि भोईरनगर परिसरातून भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे वेष परिधान करून ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष केला. इंदिरानगर येथे विद्यार्थिनींनी रिंगण सोहळा सादर केला. या उपक्रमाचे आयोजन धनराज गुटाळ, जयश्री मोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com