इथे कचरा टाकू नका, फक्त सेल्फी काढा !
मच्छिंद्र कदम ः सकाळ वृत्तसेवा
चिंचवड, ता.६ : कचराकुंड्यांची जागा चांगल्या सेल्फी पॉईंट व्हाव्यात यासाठी मोरवाडी ‘आयटीआय’मधील विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तू आणि साहित्य बनविण्यासाठी देण्यात आले आहे. या साहित्याद्वारे ते डिझाईन बनविले जाणार आहेत. त्यानंतर ते पुढे कचराकुंड्यांच्या जागी सेल्फी पॉईंट म्हणून ठेवले जाणार आहे.
‘चिंचवडेनगर येथील चौकात कचऱ्याचा ढीग’ हे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानेही महापालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे व सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने सध्या विशेष पावले उचलली आहेत.
प्राधिकरण पूल, एमआयडीसी रोड, प्रेमलोक पार्क, इंदिरानगर, दगडोबा चौक, काळेवाडी पिंपरी पूल आदी ठिकाणी ‘येथे कचरा टाकू नये’ असे फलक लावण्यात आले आहेत. सध्या चिंचवडेनगर कॉर्नर येथे सध्या एक आकर्षक ‘सेल्फी पॉईंट’ तयार करून परिसरात महापालिकेच्यावतीने स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे.
भोंडवे वस्ती, बीआरटी रोड (काळेवाडी मनपा शाळेजवळ) येथेही भित्तीचित्र व सुशोभीकरण करून कचरा टाकण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. रात्रपाळीला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली असून काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत कचरा वाहतुकीसाठी वाहनांची सुविधा देखील देण्यात आली आहे. पांढरकर चाळ, नागसेननगर व श्रीराम कॉलनी येथे घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे.
मोरवाडी आयटीआयमधील विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून चांगले सेल्फी पॉईंट बनवण्यासाठी स्क्रॅप, फळांचे ट्रे, बॅनरच्या फ्रेमचे रॉड, जुन्या रॅक तसेच जाळ्या इत्यादी साहित्य देण्यात आले आहे. त्यातून ‘आयटीआय’चे विद्यार्थी डिझाईन बनवतील. कचराकुंड्यांच्या जागेवर ते लावण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून नागरिक उघड्यावर कचरा टाकणार नाहीत. तथापि, वारंवार सूचना देऊनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल.
- भूषण शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
चिंचवडेनगरमधील काही लोक रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत तर नोकरदार मंडळी सकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत प्लास्टिक पिशवीत कचरा भरून म्हाळसा बानू कॉलनीच्या समोर आणून टाकतात. नंतर तोच कचरा भटके श्वान सगळ्या रस्त्यावर फेकून देतात. महानगरपालिकेने कचरा टाकणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.
- रणजीत आवटे, चिंचवडेनगर
CWD25A01491
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.