नवीन पार्सल पॅकेजिंग युनिट सुविधा कार्यान्वित

नवीन पार्सल पॅकेजिंग युनिट सुविधा कार्यान्वित

Published on

चिंचवड, ता.१५ ः भारतीय टपाल विभागाच्या पुणे शहर पूर्व विभागाच्यावतीने चिंचवड पूर्व टपाल कार्यालयात ‘पार्सल पॅकेजिंग युनिट’ (पीपीयू) ही नवीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सेवेद्वारे नागरिक आणि व्यावसायिकांना एकाच छताखाली पॅकिंगपासून पार्सल पाठविण्यापर्यंत सर्व सुविधा मिळणार आहे.
यापूर्वी पार्सल बाहेरून पॅकिंग करून आणल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा पाहण्यासाठी उघडावे लागत असे आणि ग्राहकाला पुन्हा पॅकिंग करावे लागत होते. तसेच पूर्वी एकाच काउंटरला स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्ट तसेच पार्सल पॅकिंग हे व्हायचे. त्यामुळे दरवेळी रांगेमध्ये उभे राहून ग्राहकांचा त्रास वाढायचा. त्यामुळे हे पार्सल पॅकिंग युनिट वेगळे बनवले आहे.
बॉक्स, रॅपिंगची किंमत किफायतशीर
आता ग्राहकांनी पाठवायच्या वस्तू टपाल कार्यालयात आणल्यावर त्या वस्तू कार्यालयात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या बॉक्समध्ये पॅक करून थेट इच्छितस्थळी पाठवता येणार आहेत. टपाल कार्यालयाकडून या बॉक्सची व रॅपिंगची किंमतही आकारांनुसार अगदी किफायतशीर दरात निश्चित करण्यात आली आहे.

पूर्वी आम्ही आमचे पार्सल बाहेर पॅकिंग करून आणायचो. परंतु टपाल कार्यालयात पुन्हा सुरक्षेच्या कारणासाठी ते काढावे लागत होते. त्यामुळे डबल पॅकिंग करावे लागायचे. तसेच स्पीडपोस्ट, रजिस्टर, पॅकिंग इतर सेवा या एकाच काउंटरला होत असल्यामुळे ताळमेळ बसत नव्हता. वेळही जास्त जायचा. मात्र आता स्वतंत्र सुविधा केल्यामुळे आमचा खूप वेळ वाचला.
- महेश बेहरा, व्यावसायिक ग्राहक

‘‘भारतीय टपाल विभागाच्या विपणन व व्यवसाय वृद्धी मोहिमे अंतर्गत चिंचवड पूर्व टपाल कार्यालयामध्ये पार्सल पॅकेजिंग युनिट (पीपीयू) आणि टपाल निर्यात केंद्र (डीएनके) कार्यान्वित करण्यात आले आहे. देशांतर्गत व परदेशात पार्सल पाठविणाऱ्यांसाठी तसेच व्यावसायिक निर्यातदारांसाठी टपाल विभागाने ‘वन स्टॉप सोल्युशन पार्सल बुकिंग काउंटर’ चिंचवड पूर्व टपाल कार्यालयात चालू केले आहे.’’
- समीर महाजन, भारतीय टपाल सेवा, प्रवर अधीक्षक डाकघर, पुणे शहर पूर्व विभाग

CWD25A01587

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com