श्री क्षेत्र देहूमध्ये १०८ देशी झाडांचे रोपण

श्री क्षेत्र देहूमध्ये १०८ देशी झाडांचे रोपण

Published on

चिंचवड, ता.१६ ः जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चिंचवड येथील आपला परिवार सोशल फाउंडेशन आणि वृक्षदायी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १०८ कुटुंबांच्या उपस्थितीत १०८ देशी झाडांचे रोपण करण्यात आले.
माणुसकी, पर्यावरण आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम साधणारा हा उपक्रम देहूच्या पवित्र भूमीत पार पडला. सकाळी सात वाजता अभंग इंग्लिश स्कूलपासून टाळ - मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडीने सुरुवात झाली. एक तासात वृक्षारोपण पूर्ण करत सहभागी सदस्यांनी मानवी साखळी तयार करून दगडगोटे उचलून ‘जय श्रीराम’च्या घोषात पर्यावरणपूरक सेतू उभारला. या उपक्रमात ४५० हून अधिक सदस्यांचा स्वयंस्फूर्त सहभाग दिसून आला.
वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांत आम्ही ५०,००० देशी झाडांचे वृक्षारोपण केले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या ४ हजार ५३८ अभंगांप्रमाणे तेवढीच झाडे लावून प्रत्येक झाडाला अभंगाची ओळख देण्याचा संकल्प आहे.’’
या उपक्रमात अभंग इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुनील कंद यांना त्यांच्या विनामोबदला सहकार्याबद्दल सन्मानचिन्ह, जास्वंदाचे रोप आणि शाल देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेतील पाच गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा उपक्रमही राबविण्यात आला.
संस्थेचे सचिव अजित भालेराव यांनी प्रास्ताविक केले. सहखजिनदार विजय शिर्के, दत्तात्रेय बोराडे, अभय गादिया, राजेश देशमुख, दीपक मराठे, वामनराव आवटे, यशवंत महाजन आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
उपाध्यक्ष अनिल शर्मा यांनी आभार मानले. डी.एस.कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश काटे, किरण कांबळे, उल्हास तापकीर, भगवंत थोरात आदींनी परिश्रम घेतले.

CWD25A01590

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com