गणेशमूर्ती घडविण्यात बालचमू झाले दंग

गणेशमूर्ती घडविण्यात बालचमू झाले दंग

Published on

चिंचवड, ता.१८ ः गणेशोत्सवात मुलांना स्वतःच्या हाताने मूर्ती घडवण्याची संधी मिळावी आणि त्यातून पर्यावरणपूरकतेचा संदेश जावा, या उद्देशाने रंगरेषा फाउंडेशनतर्फे दळवीनगर येथील ए.पी.जे अब्दुल कलाम विरंगुळा केंद्रात शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
समन्वयक माधव पाटील, प्रतिष्ठानचे समन्वयक प्रीतम येवले यांच्या पुढाकाराने कार्यशाळेचे आयोजन झाले.
या कार्यशाळेत ५ ते १० वयोगटांतील तब्बल ६० ते ६५ लहानग्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुलांसोबत त्यांच्या आजी-आजोबा व पालकांनीही सहभागी होत गणेशमूर्ती बनवण्याचा आनंद घेतला. कार्यशाळेदरम्यान मुले आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत विविध प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात गुंग झाली. रमेश खडबडे यांनी मुलांना मूर्ती बनविण्याबाबत मार्गदर्शन केले.
येवले म्हणाले, ‘‘मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला कला, रंग आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून एकाग्रतेकडे वळवणे, निर्णय क्षमता वाढवणे व मानसिक आरोग्य सुधारण्याचे काम रंगरेषा फाउंडेशन सातत्याने करत आहे.’’
कार्यशाळेला उपस्थित सर्व पालक, आजी-आजोबांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. मुलांना केवळ कला शिकण्याची संधी मिळाली नाही; तर स्वतःच्या हाताने तयार केलेल्या मूर्तीमुळे उत्सवाचा आनंद दुणावला आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आशा धनवे, श्रावणी येवले, सुषमा वैद्य, राहुल पवार, राहुल धनवे व सागर जाधव यांनी परिश्रम घेतले.


CWD25A01826

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com