
चिंचवड, ता. ३० ः शिवचातुर्य दिनानिमित्त ५६ शिवप्रेमींनी आग्रा ते राजगड अशी आव्हानात्मक सायकल मोहीम फत्ते केली. गरुडझेप असे मोहिमेचे नामकरण करण्यात आले होते.
मारुती आबा गोळे यांनी सहाव्या वर्षी ही मोहीम आयोजित केली. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पायदळ प्रमुख पिलाजी गोळे यांचे ते चौदावे वंशज आहेत. या मोहिमेत ११ दिवसांत १३१० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्यात आला. यात राज्यभरातील सायकलपटूंचा समावेश होता. चिंचवडमधील टाटा मोटर्स कंपनीतील प्रशांत पिंपळनेरकर, मोहन पुंडे, प्रकाश पाटील तसेच चाकण येथील उद्योजक संतोष कासार यांनी सक्रिय सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या ३५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ही मोहीम आयोजित करण्यात आली. १७ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर शिवज्योत प्रज्वलित करून मोहीमेस प्रारंभ झाला. त्यानंतर ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, माहेश्वर, नरडाणा, चांदवड,संगमनेर, भोसरीमार्गे २७ ऑगस्ट रोजी राजगडावर मोहिमेचा समारोप झाला. वाटेत अनेक ठिकाणी सायकलपटूंचे उत्स्फूर्त स्वागत झाले.
मोहन पुंडे मोहिमेतील अनुभवाविषयी म्हणाले की, "गरुडझेप मोहीम ही केवळ सायकलवरून नव्हे तर इतिहासाच्या पाऊलखुणांवरून केलेला विलक्षण समाधान देणारा प्रवास होता.”
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.