पिंपरी-चिंचवड
कुंकूमार्चन सोहळा उत्साहात
चिंचवड, ता.७ ः चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या श्री गजानन महाराज मंदिरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्रीसुक्त पठण व कुंकूमार्चन सोहळा धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात झाला.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तोत्राने झाली. त्यानंतर सोळा वेळा श्रीसूक्त पठण, एक जोगवा, आशीर्वाद प्रार्थना, महाआरती आणि शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास परिसरातील महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच परंपरेनुसार यंदा कोजागरी पौर्णिमेनिमित्त कुंकूमार्चन सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला, अशी माहिती श्री गजानन सत्संग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.