पिंपरी-चिंचवड
स्पर्धांचे पारितोषिक वितरण
चिंचवड, ता. ८ ः वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी मित्र मंडळात कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष नीलेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पडवळ, रवींद्र केदारी, राजीव शेंडे तसेच इतर पदाधिकारी यांनी केले. मंडळातील सभासद, गणेशभक्तांनी विदर्भ आणि मराठवाडा येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी दैनंदिन वापरातील साहित्य व रोख रक्कम स्वेच्छेने मंडळाकडे सुपूर्त केली असून या वस्तूंचे वितरण लवकरच पूरग्रस्त भागात जाऊन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.