शहीद अशोक कामटे बसस्थानकाची दुरवस्था

शहीद अशोक कामटे बसस्थानकाची दुरवस्था

Published on

चिंचवड, ता. १४ ः चिंचवड गावातील शहीद अशोक कामटे बसस्थानकाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तसेच धाडस, नेतृत्वगुण आणि समर्पणासाठी मरणोत्तर अशोकचक्र पुरस्काराने लाभलेल्या व्यक्तीचे नाव देण्यात आलेल्या सुविधेची अशी दुरवस्था झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बसस्थानकाचा शहीद अशोक कामठे यांच्या नावाचा लोखंडी फलक तुटला आहे. तो एका सीमाभिंतीच्या गजांना टांगण्यात आला आहे. कापडी फलक फाटले आहेत. स्थानक परिसरात कचरापेट्या भरून गेल्या आहेत. त्यातून कचरा खाली पडला आहे.
परिसरातील रस्ते, चेंबर खराब आहेत. येथून जवळच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला बसची प्रतीक्षा करीत उभे असतात. त्यांना अस्वच्छता, दुर्गंधी आणि अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महापालिका तसेच पीएमपीएल प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या लौकिकाला साजेशी सुविधा देण्यात महापालिका का अपयशी ठरत आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
---
चिंचवडमधील शहीद अशोक कामठे बसस्थानकाच्या चारही बाजूंनी शाळा आहेत. चौकातही लहान मुलांची शाळा आहे. एक मॉल व रुग्णालयामुळे या परिसरात सतत वर्दळ असते. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांचा समावेश असतो. बसस्थानकातील कचरा, अस्ताव्यस्त पार्किंग आणि प्रशासनाचे दुर्लक्षामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या चौकात तातडीने सिग्नल बसविण्याची आवश्यकता आहे. योग्य कारवाई झाली नाही तर विद्यार्थी वाहतूक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
- सुनील लांडगे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड विद्यार्थी वाहतूक संघटना
---
पूर्वीचे बसस्थानक भाजी मंडईजवळ होते. जागा अपुरी असल्याने ते रुग्णालयाजवळ हलविण्यात आले, पण तेथेही व्यापारी इमारत उभारल्याने पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली. नागरिकांचा विरोध असूनही शहीद अशोक कामटे बसस्थानक व आंबेडकर चौक परिसराची महापालिकेने बकाल अवस्था केली आहे.
- सचिन कोष्टी, सामाजिक कार्यकर्ते
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com