पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक–१९ भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये होणार सामना

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक–१९ भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये होणार सामना

Published on

प्रभाग १९ ः दळवीनगर, भाटनगर, रमाबाईनगर

संमिश्र मतदारांचा
प्रभाव अधिक

- मच्छिंद्र कदम
प्र भाग १९ मध्ये निवासी, व्यावसायिक, तसेच १० ते १२ झोपडपट्ट्यांचे क्षेत्र आहे. अर्ध्याहून अधिक मतदार झोपडपट्टी भागातील आहेत. हे मत निर्णायक ठरत असल्याने सर्व पक्षांनी झोपडपट्टीतील नागरिकांशी संपर्क वाढवला आहे. या भागातील मतदारांना मूलभूत सुविधा, पाणी व गटार व्यवस्थेच्या प्रश्नांवर तोडगा अपेक्षित आहे. सुसंघटित आणि निर्णायक मतदार मानले जाते. पिंपरी भागामध्ये सिंधी समाजाचे मतदान आहे. झोपडपट्टीतील मतदान व अंतर्गत नवे जुने इच्छुकांची संख्या पाहता भाजपसाठी थोडेफार आव्हान ठरेल. तर झोपडपट्टीमधील मध्यमवर्गीय व उच्चभ्रू सोसायट्यांतील मत राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकण्याची शक्यता आहे.

समाविष्ट परिसर
विजयनगर, उद्योगनगर, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईर कॉलनी, गावडे पार्क, भीमनगर, भाटनगर, सम्राट अशोकनगर, दळवीनगर, संतोषनगर, रमाबाईनगर, आंबेडकर नगर, सॅनिटरी चाळ, एम्पायर इस्टेट

राजकीय स्थिती
- राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षांचीही हालचाली
- भाजसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची तयारी आधीपासूनच

दृष्टिक्षेपात...
- प्रभागातील सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झोपडपट्टी क्षेत्रातून
- २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व
- कामगार आणि झोपडपट्टीतील मतदार

प्रचारातील प्रमुख मुद्दे
- विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते
- गटारव्यवस्था, आरोग्य सुविधा
- रोजगार व प्रशिक्षणावर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com