महावितरण जनमित्रांचा बिजलीनगर येथे गौरव

महावितरण जनमित्रांचा बिजलीनगर येथे गौरव

Published on

चिंचवड, ता.७ : महावितरणच्या वतीने राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त बिजलीनगर येथे महावितरणमधील जनमित्रांचा गौरव करण्यात आला. सर्व जनमित्रांना सुरक्षा साधनांच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी सेफ्टी हेल्मेट आणि महावितरणची टोपी भेट म्हणून देण्यात आली.
गणेशखिंड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी लाईनमन हे महावितरणचे खरे शिलेदार असल्याचे सांगत त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे होते. पिंपरी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वास भोसले, दिवाकर देशमुख, सचिन पाटील, कल्याण गिरी, भुजंग बाबर तसेच विभागातील सर्व सहाय्यक अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षेची शपथही देण्यात आली. कामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या प्रसंगी तांत्रिक कामगार युनियन ५०५९ चे किशोर चोभे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच वीज कामगार महासंघाचे गिरीश पिसाळ, मागासवर्गीय विद्युत संघटनेचे सिद्धार्थ थोरात आणि इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफचे सय्यद यांनीही आपले विचार मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com