गृहलक्ष्मी स्वाभिमान अभियान चिंचवडमध्ये उत्साहात

गृहलक्ष्मी स्वाभिमान अभियान चिंचवडमध्ये उत्साहात

Published on

चिंचवड, ता.७ ः आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्योगनगर येथे अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळ आणि तेरापंथ महिला मंडळ, चिंचवड यांच्या वतीने गृहलक्ष्मी स्वाभिमान अभियान कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल वानप्रस्थान आश्रमाच्या कविता छाजेड, रे ऑफ होप संस्थेचे संजय कुमार आणि सावली निवारा संस्थेचे गौतम थोरात यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार उमा खापरे, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा उबाळे, तेरापंथ महिला मंडळ, पिंपरी चिंचवडच्या संस्थापिका लता कांकरिया, अध्यक्ष ललिता गादिया, मंत्री मोनाली लोढा, प्रचारप्रसार मंत्री नीलम डागा उपस्थित होत्या.
संस्थापिका लता कांकरिया यांनी प्रास्ताविक करताना तेरापंथ महिला मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला.देशभरात मंडळाच्या सुमारे ५०० शाखा असून ६५ हजार सदस्य कार्यरत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, मागील महिन्यात तेरापंथ महिला मंडळाने विश्व कर्करोग दिनानिमित्त पॅप स्मेअर टेस्टद्वारे जागतिक स्तरावर तपासण्या करून विक्रम नोंदविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी मंडळाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. तसेच महिलांमधील स्वाभिमान, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
CWD26A02852

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com