महिला दिनी स्त्री शक्तीचा गौरव

महिला दिनी स्त्री शक्तीचा गौरव

Published on

चिंचवड, ता. ८ ः जागतिक महिला दिनानिमित्त जीवन विद्या मिशन आणि उत्कर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्री मुक्ती नव्हे, स्त्री सन्मान’ या विषयावर रामकृष्ण मोरे सभागृह येथे (ता. ८) सकाळी १०:३० वाजता विशेष कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमात अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकर यांची संवादात्मक मुलाखत उद्योजिका सुकीर्ते गुमस्ते यांनी घेतली. संवादा दरम्यान निंबाळकर म्हणाल्या, स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची शक्ती आहे. महिलांच्या अनेक समस्यांची उत्तरे त्यांच्या सकारात्मक विचारांत दडलेली असतात. कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड शहराचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर, जीवन विद्या मिशनचे व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर तसेच ‘आपला परिवार सोशल फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष एस.आर.शिंदे उपस्थित होते. या प्रसंगी सहभागी महिलांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com