सायन्स पार्क येथे महिलांचा सन्मान सोहळा

सायन्स पार्क येथे महिलांचा सन्मान सोहळा

Published on

चिंचवड : ता. ९ : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या वतीने महिला दिनी आयोजित करण्यात आला. संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल नीता भावसार, संगीता घोडके, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. डॉ. अनुराधा ठाकरे, महापालिकेतील उपअभियंता सुरेखा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या वेळी सायन्स पार्कचे संचालक प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा खंपरिया यांनी सन्मानार्थींच्या मुलाखती घेतल्या.
यावेळी श्रद्धा खंपरिया यांनी सादर केलेल्या पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या कार्याविषयीच्या सादरीकरणाला ओरिसा येथे झालेल्या परिषदेत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांनी मनोगत व्यक्त करताना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विज्ञान क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com