भावस्पर्शी नाटिका सादर

भावस्पर्शी नाटिका सादर

Published on

चिंचवड, ता. ९ : वाल्हेकरवाडी येथील श्री संत नामदेव शिंपी समाज मंदिरात नामाई महिला मंडळाच्या वतीने (ता.८) जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी भावस्पर्शी नाटिका यावेळी सादर करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. प्रीती ढगे यांनी गरोदरपणात घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. डॉ. मोहिनी बेंद्रे यांनी कर्करोग व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांविषयी माहिती दिली. विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेवर आधारित फॅशन शो विशेष आकर्षण ठरला. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये डॉ. प्रीती ढगे, उज्वला काकडे, भारती चव्हाण, धनश्री गनबोटे आणि शुभदा पाटुकले यांनी मनोरंजनात्मक सादरीकरण केले. मंडळाच्या अध्यक्षा संगीता खर्डे यांनी संयोजन केले. श्रद्धा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com