दृष्टिहीन मुलींचा सन्मान
चिंचवड, ता.१० : जागतिक महिला दिनानिमित्त निर्भया सामाजिक संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दृष्टिहीन मुलींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेविका शारदाताई मुंडे, माई घटने, पोलिस अधीक्षक आशा लोमटे आणि अनुराधा नरवडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. महावीर राखी सेंटर येथील सारिका पाटील, प्राची गुप्ता, सुईशा गायकवाड, शिवकन्या आणि आरती या दृष्टिहीन मुलींचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सुमन माने, उपाध्यक्ष सुनीता गोखले यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या नियोजनात शशी सिंग, सुनीता साबळे, सुनीता नलावडे, नीलिमा सिंग, प्रतिभा चव्हाण, स्वाती पाटील, विजया मोरे आणि मालती सिंग यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

