उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका
चिंचवड, ता. ११ : दळवीनगर ते गंगानगर या मुख्य रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून सांडपाणी चेंबर उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अपघात टाळण्यासाठी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी दगड तसेच झाडांच्या फांद्या ठेवून इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, इतका कालावधी उलटूनही महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे कोणतीही दखल घेतलेली नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या रस्त्यावर रात्रीच्या वेळी पुरेशा विद्युत दिव्यांची सोय नसल्यामुळे अंधारात दुचाकीस्वार किंवा पादचारी अचानक उघड्या चेंबरमध्ये पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, संबंधित महापालिका विभागाने तातडीने या चेंबरला झाकण बसवून परिसरातील नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

