चापेकर बंधूंच्या हौतात्म्यामुळे देशाला प्रेरणा

चापेकर बंधूंच्या हौतात्म्यामुळे देशाला प्रेरणा
Published on

चिंचवड, ता.१९ : ‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या हौतात्म्यामुळे देशात देशभक्तीचे स्फुलिंग प्रज्वलित झाले आणि त्यातूनच स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा मिळाली,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी केले.
निगडी प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बहिर्जी नाईक यांचे तेरावे वंशज दादाराव जाधव-नाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सोमण यांनी रँडवधासह चापेकरबंधूंच्या कार्याचा इतिहास ओघवत्या शैलीत मांडत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन इतिहास समजून घ्यावा, असे आवाहन केले. किशोर चव्हाण यांनी चापेकर स्मारक समितीच्या कार्याचे कौतुक करत संग्रहालय उपक्रमाचा विशेष उल्लेख केला. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले.
तत्पूर्वी, सकाळी चिंचवडमध्ये अभिवादन फेरीचे आयोजन करण्यात आले. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी चापेकर बंधूंच्या विविध प्रसंगांचे नाट्य, गीत व मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. प्रा.दिगंबर ढोकले, स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अशोक नगरकर यांनी आभार मानले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक अतुल आडे, समर्थ डोंगरे, सागर शेवाळे, विनोद डोरले, किरण गायकवाड आणि शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com