आंब्यांच्या आरासाने खुलले गजानन महाराज मंदिर

आंब्यांच्या आरासाने खुलले गजानन महाराज मंदिर
Published on

चिंचवड, ता.१४ ः चिंचवडगाव तानाजीनगर परिसरातील गजानन सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित २२ वा ‘आंबा महोत्सव’ भक्तिमय वातावरणात झाला. तब्बल १५०० हून अधिक आंब्यांची आकर्षक आरास करून गजानन महाराजांची मूर्ती सजविण्यात आली होती.
सुरुवातीला अवघ्या १०० आंब्यांपासून सुरू झालेला हा उपक्रम यंदा १५०० आंब्यांपर्यंत पोहोचला. मंदिरातर्फे १००० आंबे आणण्यात आले होते, तर सेवेकरी व भाविकांनी सुमारे ५०० हून अधिक आंब्यांचे योगदान दिले.
पहाटे ५.३० वाजता गजानन महाराजांच्या मूर्तीवर काही आंब्यांपासून तयार करण्यात आलेल्या आमरसाचा अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी वापरलेला आमरस नंतर संध्याकाळी महाप्रसादासोबत भाविकांना वितरित करण्यात आला.
सायंकाळी श्रींची महाआरती झाली. नियोजन अध्यक्ष विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, प्रताप भगत, श्रीपाद जोशी आणि चिंचवड ग्रामस्थांनी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com