नालेसफाईचा फज्जा; काढलेला गाळ पहिल्याच पावसात पुन्हा नाल्यात

नालेसफाईचा फज्जा; काढलेला गाळ पहिल्याच पावसात पुन्हा नाल्यात
Published on

चिंचवड, ता.२५ ः चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरून जाणाऱ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी या नाल्याची साफसफाई करण्यात आली होती. अंदाजे एक ते दोन ट्रक गाळ व कचरा काढला गेला मात्र नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा अद्यापही नाल्याच्या कडेलाच पडून असल्याने पहिल्याच पावसात तो पुन्हा नाल्यात वाहून गेला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाचा उद्देशच व्यर्थ ठरत असल्याचे चित्र दिसते.
नाल्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या, पूजासाहित्य तसेच विविध प्रकारचा घनकचरा तरंगताना दिसत आहे. साफसफाईदरम्यान काढलेला गाळ वेळेत उचलला गेला नसल्याने तो पावसाच्या पाण्यासोबत पुन्हा नाल्यात मिसळला आहे. परिणामी नाल्याची वहनक्षमता कमी झाली असून मुसळधार पाऊस झाल्यास पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिकांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून नालेसफाईची कामे केली जातात. मात्र काढलेला गाळ आणि कचरा त्वरित हटविण्याकडे दुर्लक्ष होते. केवळ नाले स्वच्छ करण्यापुरतीच मोहीम मर्यादित न ठेवता त्यातून बाहेर काढलेला गाळ वेळेत उचलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने या ठिकाणची तातडीने पाहणी करून नाल्याच्या कडेला पडून असलेला गाळ व कचरा हटवावा, तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करावी, जेणेकरून महापालिकेचा वारंवार होणारा खर्च वाचेल. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरील नाल्याची साफसफाई करताना गाळ काढण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी गाळ उचलण्याचे काम राहिले असल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाला सूचना करण्यात येतील. तसेच नाल्याच्या कडेला पडून असलेला गाळ लवकरात लवकर उचलून परिसर स्वच्छ करण्यात येईल.
- राजू साबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com