दिवाळीसाठी गावी निघालाय? मग, इकडे लक्ष द्या !

दिवाळीसाठी गावी निघालाय? मग, इकडे लक्ष द्या !
Published on: 

चिंचवड, ता. ७ : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचा किंवा पर्यटनाचा बेत आखला जातो. प्रवासाचा आनंद, नातेवाइकांच्या भेटी आणि सणाचे क्षण समाज माध्यमांवर टाकण्याची अनेकांना घाई असते. मात्र, हाच उत्साह घराच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो. आपण किती दिवस बाहेरगावी आहोत. घर बंद आहे किंवा कुटुंब प्रवासात आहे, अशी माहिती समाज माध्यमावरून चोरट्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात समाज माध्यमांचा वापर करताना सावध राहण्याचे आवाहन चिंचवड पोलिसांनी केले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक घरे काही दिवस बंद राहत असल्याने घरफोडी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी चिंचवड पोलिसांनी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. चिंचवड परिसरासह सर्व नागरिकांना सजग केले जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयबीचे संतोष उभे व सागर आढारी यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. चिंचवड पोलिस ठाणे अंतर्गत ग्रामरक्षक दलाचेही सहकार्य घेतले जात आहे.


दिवाळीचा आनंद साजरा करताना घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका. समाज माध्यमांवर प्रवासाचे फोटो, ठिकाण किंवा घर किती दिवस बंद राहणार आहे, याची माहिती प्रसिद्ध करणे टाळा. अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नका. शेजाऱ्यांनीही परिसरातील संशयास्पद हालचालींकडे लक्ष ठेवावे. नागरिकांच्या सतर्कतेतून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल.
- दत्तात्रय चासकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिंचवड पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.