बाळासाहेब ठाकरे जयंती; देहूत प्रतिमेचे पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब ठाकरे जयंती;
देहूत प्रतिमेचे पूजन
बाळासाहेब ठाकरे जयंती; देहूत प्रतिमेचे पूजन

बाळासाहेब ठाकरे जयंती; देहूत प्रतिमेचे पूजन

sakal_logo
By

देहू, ता. २५ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९७ व्या जयंती देहू शहर बाळासाहेबांची शिवसेना, भाजप व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
देहू नगरपंचायत कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा स्मिता चव्हाण याच्या हस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून चार हायमास्ट दिवे बसविण्यात आले. नगरपंचायत कार्यालयाच्या समोर, परंडवाल चौक, विठ्ठलवाडी श्रीकृष्ण मंदिर चौक व गंधर्व विहार चौक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन करून लोकार्पण करण्यात आले. पंढरपूर देवस्थानचे माजी विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, महंत पिलावुनसकर बाबा, उपनगराध्यक्षा शीतल हगवणे, प्रवीण काळोखे, मयूर शिवशरण, मीनाताई कुऱ्हाडे, शुभंगीताई काळंगे, ज्येष्ठ नेते अशोकराव साकोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे, संतोष चव्हाण, शैलेश चव्हाण, साहेबराव शिंदे, दत्तात्रेय पाचर्णे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख सुनील अण्णा हगवणे, भाजप अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ परंडवाल यांनी आयोजन केले होते.