‘तुकारामांनी धार्मिकतेतून जीवनाचा मार्ग दाखविला’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तुकारामांनी धार्मिकतेतून जीवनाचा मार्ग दाखविला’
‘तुकारामांनी धार्मिकतेतून जीवनाचा मार्ग दाखविला’

‘तुकारामांनी धार्मिकतेतून जीवनाचा मार्ग दाखविला’

sakal_logo
By

देहू, ता. ३१ : जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी धार्मिक मार्गातून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देहू येथे सोमवारी (ता.३०) केले. पुण्यातील ॲड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनच्या पुढाकारातून कैवल्य कथा या युट्युब चॅनेलवरील संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर आधारित तिसरं पुष्प म्हणजे ‘‘संत तुकाराम महाराजांच्या’’ गोष्टीचे ॲनिमेशन स्वरूपातील चलचित्राचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराज देऊळवाडा येथे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आज संत तुकाराम महाराजांच्या चरणी ‘‘संत तुकाराम महाराजांच्या’’ गोष्टीरूप ॲनिमेशन चलचित्राचे उद्‍घाटन झाले याचा मला आनंद होत आहे. हे ॲनिमेशन चलचित्र जास्तीत जास्त लोकांनी पाहावे, सोबतच त्याचं इंग्लिश, हिंदी मध्ये रूपांतर व्हावे आणि दूरदर्शन, सह्याद्री वाहिनीवरून याचे प्रक्षेपण झाले पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांना अध्यात्माची गोडी लागावी, वारकरी सांप्रदायिक संतांच्या चरित्राची माहिती व्हावी, यासाठी फाउंडेशनच्यावतीने कैवल्य कथा या युट्युब चॅनेलवर वारकरी संतांच्या आध्यात्मिक ॲनिमेटेड फिल्म तयार करण्यात आली आहे.

मुलांच्या हातून मोबाईल सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने याच मोबाईलच्या माध्यमातून मुलांना अध्यात्माची गोडी लागावी याकरिता पुण्यातील ॲड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनतर्फे पुढाकार घेतला आहे. देहू संस्थान विश्वस्त माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, प्रशांत महाराज मोरे, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर विश्वस्त श्रीमती. ॲड. माधवी निगडे, शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य शैलजा खंडागळे, प्रकाश महाराज जवंजाळ, शिवाजीराव मोरे, आळंदी शिक्षण संस्थेचे श्री. नरहरी महाराज चौधरी, शांताराम महाराज निम्हण, विलासतात्या बालवडकर उपस्थित होते.