देहूतील पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी

देहूतील पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी

देहू, ता. २ : देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकात कापूर ओढ्यावरील पुलाचे कठडे तुटले आहेत. त्यामुळे, पूल वाहतुकीस धोकादायक बनला असून देहू नगरपंचायतीने पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.
दोन महिन्यांनंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आहे. त्यापूर्वी पूल दुरुस्त करण्याची गरज भाविकांनी व्यक्त केली आहे. देहू ते देहूरोड हा पालखी मार्ग ५ किलोमीटर असून अरुंद आहे. त्यामुळे, येथे दररोज वाहतूक कोंडी होते. त्यातच तळवडे, चाकण येथे कामानिमित्त हजारो वाहने पालखी मार्गाचा अवलंब करत आहेत. त्याने, अपघाताचा धोका वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com