माळीनगरमधील श्रीकृष्ण मंदिरात
आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर

माळीनगरमधील श्रीकृष्ण मंदिरात आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर

देहू, ता. १५ : नवीन पिढी ही आध्यात्मिक संस्कारापासून बाजूला जात आहे. त्यांना चांगला संस्कार मिळावा आणि त्यांच्यात सुसंस्कार रुजावा यासाठी, लहान मुलांसाठी बालसंस्कार शिबिर माळवाडीत आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे हे सहावे वर्ष आहे. परिसरातील गावातील ७० मुले यात सहभागी झाली होती. त्यांच्यात महानुभाव पंथातील समता, ममता, थोराबद्दल आदरभाव, सहानुभूती, प्रेम, मानवता, शाकाहारी जीवन हे संस्काराचे बीज रुजवले गेले. उद्याच्या सुजाण, सुसंस्कृत नागरिकत्वाची जडणघडण होण्यास याची नक्कीच मदत होईल, म्हणून या बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे मुख्य विषय योगासने, प्राणायाम श्रीमद्भगवद्गीता पठण, धर्मसंस्कार, मुलांचे, भविष्य मैदानी खेळ आणि सायंकाळी मनोरंजनासाठी मुक्तांगण या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमासाठी महंत मुकुंदराज अकुळनेकर, अमोल कोल्हेकर, मुळावकर, हरिपाळ शास्त्री, भीष्मचारी बाबा यांनी भेट दिली.
या बाल संस्कार शिबिर समारोप सोहळ्यामध्ये मुलांना पारितोषिक पुस्तक वाटप प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्‍घाटक श्रीसागरमुनी महानुभाव यांच्या हस्ते झाले. टेंभुरकर अध्यक्ष होते. महंत हंसराज मराठे आणि अनिल दादा मराठे यांनी आयोजन केले होते.
अभय राजशास्त्री, गोपाल शास्त्री, आशुतोष शास्त्री, अनिलबापू अमृतराज पंजाबी, प्रा. अंजनगावकर यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com