संस्कारित माणसामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर

संस्कारित माणसामुळे
संस्थेच्या नावलौकिकात भर
Published on

पिंपरी, ता. २६ : ‘‘संस्कारित माणसाच्या काम करण्याने संस्थेच्या नावलौकिकात भर पडते. समाजाची व स्वतःची प्रगती होते. शिक्षण क्षेत्रात काम करून समाजात अनेक प्रतिष्ठित नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करत असतो,’’ असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी शनिवारी आकुर्डी येथे केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत महाविद्यालयात तीस वर्ष सेवेनंतर महाविद्यालयातील पाच शिक्षक सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार घाडगे यांच्या हस्ते झाला. मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब आवारी, किरण देशपांडे, प्राचार्य भानुदास मालुसरे, अविनाश ओतुरकर, सत्कारमूर्ती शिक्षक के. डी. गायकर, विनायक बेहेरे, हरिभाऊ मावळे, शिक्षिका सिंधू मोरे, राजमती नायकवडी व विविध शाळांतील मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते. रावसाहेब आवारी म्हणाले, ‘‘प्रत्येकाने आपल्या कामावर निष्ठा ठेवली पाहिजे. तीस वर्षांपूर्वी काळ वेगळा होता. लोक निष्ठेने काम करायचे. त्यात यश आणि आनंद या दोन्ही गोष्टी होत्या. आता परिस्थिती बदललेली आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल त्या कामावर निष्ठा ठेवा.’’ उपप्राचार्य केडी गायकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, शाळेमध्ये काम करत असताना विद्यार्थी केंद्रबिंदू समजून काम केल्यास कामामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत.
प्राचार्य मालुसरे यांनी प्रास्ताविक केले. शरद सस्ते माधुरी पवार, विद्या कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापिका सुरेखा पठारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com