देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन

देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन

Published on

देहू, ता. ०१ : देहू नगरपंचायत हद्दीतील मिळकतकर थकबाकी असलेल्या नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. थकीत मिळकत करावर प्रति महिना दोन टक्के शास्ती दंडाने व्याज आकारले जाते. त्यामुळे व्याजाची रक्कम वाढत आहे. ही रक्कम भरताना मिळकतदारांना दिलासा मिळावा, यासाठी व्याजामध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. येत्या 10 ऑगस्ट पर्यंत मिळकतकर थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घेता येईल. आत्तापर्यंत 40 थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशी माहिती कर विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com