देहू-देहूरोड दरम्यानच्या
पुलाचे काम संथगतीने

देहू-देहूरोड दरम्यानच्या पुलाचे काम संथगतीने

Published on

देहू ,ता. २३ : देहू नगरपंचायत हद्दीतील देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौक येथील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पुलाचे काम जलद व्हावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
परंडवाल चौक येथे नगरपंचायतीच्या वतीने पुलासाठी मार्च महिन्यात मार्किंग करण्यात आले होते. त्यानंतर काम सुरू होऊन केवळ दोन भिंत उभारण्यात आल्या. अकरा महिन्यांत कामात कोणतीच प्रगती नाही. केवळ दोन भिंत पूर्ण आहेत. या बाबत देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी सांगितले. या मार्गावरील परंडवाल चौकात ४५ मीटर रुंदीचा पुलाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून साडेबावीस मीटर उजवीकडे आणि साडेबावीस मीटर डावीकडे रुंद पूल होणार आहे. नगरपंचायतीच्या पाच कोटी ४८ लाख रुपये निधीतून हा पूल होणार आहे. पूल रुंद झाल्याने परंडवाल चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. एका पिलरचे काम झाले आहे. दुसऱ्या पिलरचे काम सुरू आहे. ते झाले की त्यावर स्लॅब होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com