पिंपरी-चिंचवड
देहूरोड गुरुद्वारातर्फे कार्यक्रमासाठी मिठाई
देहू, ता. २५ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने खारघरला २८ फेब्रुवारी व एक मार्च रोजी ‘हिंद-दी-चादर’ हा भव्य कार्यक्रम होणार आहे. यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देहूरोड गुरुद्वाराच्या वतिने पाच हजार किलो मिठाई बनवून देण्यात येणार आहे. श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हा कार्यक्रम होत आहे. सहभागी भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने समाजातील नागरिक मोठ्या संख्येने मदत करत आहेत. याचाच एक भाग म्हणून बालुशाहीस, बुंदी जिलेबी व इतर प्रकारच्या मिठाया तयार केल्या जात आहेत. शासनाच्या भाविकांच्या सोयीसाठी बस व्यवस्था केली आहे, अशी माहिती देहूरोड गुरुद्वारा समिती व राज्य अल्पसंख्याक विकास विभागाचे सदस्य गुरमीत सिंग रत्तू यांनी दिली.
--------

