देहूत मराठी दिन उत्साहात साजरा

देहूत मराठी दिन उत्साहात साजरा

Published on

देहू, ता.२७ : सॅमसन मेमोरियल रिपब्लिक हायस्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका संयुक्ता आरेकर यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. सहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत, आठवीच्या विद्यार्थ्यांनी विनोदी नाटक, बालवाडीतील मुलांनी कोळी गीत, सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा, तिसरी व चौथीच्या मुलांनी ‘देवा मला शाळेत जायचं’ हे गीत, पोषण आहारावर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कविता गायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना भाविका गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मराठी समितीचे अध्यक्ष आनंद टिळेकर यांनी कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती सांगितली. यावेळी मराठी समितीच्या सदस्या दीपाली शिंदे, मोनिका पाटील, गौरी भांडवलकर, निकिता गायकवाड, शीतल वाजे, अर्चना वाघमारे, जयंता ढोबळे, अश्विनी गोष्टी आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com