आरोग्य विभागाकडून भाविकांसाठी सुविधा

आरोग्य विभागाकडून भाविकांसाठी सुविधा

Published on

देहू, ता. १ ः जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला असल्याने भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या विविध खात्यांची लगबग सुरु आहे. आरोग्य विभागाच्या वतीने पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आले आहेत. गावातील खासगी रुग्णालयातील १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॅा. किशोर यादव यांनी ही माहिती दिली. बीज सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. त्यांना आरोग्य सुविधा वेळेत मिळाव्या म्हणून मुख्य देऊळवाडा, गाथा मंदिर परिसर, संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा ठिकाण येथे बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत.
सध्या विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण सोहळे सुरु आहेत. परिसरातील गावांत माळवाडी, विठ्ठलवाडी येथेही बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी दहा खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. भाविकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी एक कार्डीॲक रुग्णवाहिका सज्ज असेल. गावातील विविध ठिकाणी चार रुग्णवाहिका उपलब्ध असतील.
आरोग्य सेवेसाठी पाच वैद्यकीय अधिकारी, आठ आरोग्य सहाय्यक, १० आरोग्य सेवक, १० परिचारिका असे एकूण ४० कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. यात्रा काळात विविध ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॅाल असतात. तेथील अन्नपदार्थ तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले आहे. उन्हाळा असल्यामुळे हॅाटेलमधील अन्नपदार्थ तपासण्यासाठी इतर चार पथके तैनात करण्यात आली आहेत.
गावातील विविध ठिकाणांहून बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत. कडक उन्हात बीज सोहळा आहे. त्यामुळे भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा होणे आवश्यक असून त्या बाबत देहू नगरपंचायत प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com