ग्रामपंचायतीची जुनी वास्तू देहूत पाडण्यास सुरुवात

ग्रामपंचायतीची जुनी वास्तू देहूत पाडण्यास सुरुवात
Published on

देहू, ता.१३ : देहूतील ग्राम पंचायत कार्यालयाची जुनी भव्य दगडी वास्तू देहू नगरपंचायत प्रशासनाकडून बुधवारी (ता.१३) पाडण्यास सुरुवात झाली. देहूच्या १९५८ पासूनच्या कालखंडाची साक्ष असलेली वास्तू पाडण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
देहूतील हे समाज मंदिर अर्थात ग्रामपंचायत कार्यालयाची जागा चंद्रभागा यांच्या स्मरणार्थ बाबासाहेब इनामदार यांनी दिली. या वास्तूचे भूमिपूजन १७ जुलै १९५८ रोजी तत्कालीन राज्यपाल श्री प्रकाश यांचे हस्ते झाले. त्यानंतर ६ ऑक्टोबर १९५९ रोजी मुंबई प्रांताचे बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. त्यावेळी सोपान मुकिंदा हगवणे हे सरपंच होते. ही वास्तू पाडण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाकडून घेण्यात आला.
याबाबत देहू नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन कोंडे म्हणाले, ‘‘नगरपंचायत प्रशासनाकडून एक कोटी २५ लाख रुपये खर्च करून चार मजली बहुउद्देशीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात सभागृह, ग्रंथालय व इतर विविध विभाग असणार आहे.’’
परंतु, गावाच्या मध्यवर्ती भागातील वास्तू नगरपंचायत प्रशासनाकडून जतन करून त्यात ग्रंथालय व मुलांसाठी अभ्यासिका करणे आवश्यक होते. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांना कल्पना देणे गरजेचे होते, अशी भावना देहू ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com