

देहू, ता. १७ : सुट्टीच्या दिवशी इंद्रायणी नदीकाठी फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीपात्रात चमकदार वस्तू दिसल्याने ती काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना बुधवारी (ता. १६) देहू येथे घडली. अंकित चौहान (वय ३०, मूळ रा. लखनऊ, सध्या रा. देहू) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित हा देहू येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. बुधवारी सुट्टी असल्याने तो मेव्हण्यासोबत हॉटेलजवळील इंद्रायणी नदीकाठी फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला नदीच्या पाण्यात चमकदार वस्तू दिसली. ती वस्तू काढण्यासाठी तो पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मुसुडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून अंकितचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर मावळ आपदा मित्र आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पथकाने शोधमोहीम राबवून अंकितचा मृतदेह बाहेर काढला. या वेळी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे नीलेश गराडे, रवी कोळी, सर्जेश पाटील, अनिष गराडे, प्रणव मेंगडे, सिद्धेश दाभाडे, ओंकार अबनावे यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.