श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर  हरिनाम सप्ताहाचे आयोजन
श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहाचे आयोजन

sakal_logo
By

भंडारा डोंगरावर २६ पासून नामोत्सव

ज्ञानेश्वर महाराज चरीत्र, कीर्तन, भजन अन् भारुडाची मेजवाणी

इंदोरी, ता. १६ ः संत तुकाराम महाराजांची साधनाभूमी असलेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान माघ शुद्ध दशमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

याबाबत श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले, ‘‘ता. १६ पासून होणाऱ्या सप्ताहात दररोज काकड आरती, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच जागराचा कार्यक्रम होणार आहे.
गाथा पारायण व्यासपीठाचे नेतृत्व ज्येष्ठ कीर्तनकार नाना महाराज तावरे (वाकुळणी - जालना) हे करणार असून, २६ पासून अनुक्रमे पोपट महाराज कासारखेडेकर (धुळे), एकनाथ महाराज चतचत्तरशास्त्री (पारनेर), जलाल महाराज सय्यद (नाशिक), माऊली महाराज कदम
(आळंदी), चंद्रशेखर महाराज देगलूरकर (नांदेड), पंकज महाराज गावडे (पुणे), बाळकृष्ण महाराज वसंतगडकर
(कराड), यांची कीर्तन सेवा होणार आहे. दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत डॉ. विकासानंद महाराज मिसाळ (नगर)
यांचे काल्याचे कीर्तन होईल. गाथा पारायणात किमान हजार भाविक सहभागी होणार असून, त्याची निवास व भोजन व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात येईल. दरवर्षी या सप्ताहात महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गुजराथ राज्यांतून सुमारे एक लाख भाविक दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात.’’

सप्ताहात विशेष
- दररोज चार ते सहा भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ (अकोला-विदर्भ) यांचे कैवल्यमूर्ती संत ज्ञानेश्वर महाराज भावविश्व निरूपण
- माघ शुद्ध दशमीच्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारी रोजी दुपारी बारा ते दीड या वेळेत गणेश महाराज शिंदे व सन्मिता शिंदे यांचा ‘मोगरा फुलला’ हा अभंगवाणीचा कार्यक्रम
- दुपारी दोन ते साडेचार दरम्यान प्रसिद्ध भारुडकार लक्ष्मण महाराज राजगुरू (इंदापूर) यांचा भारुडाचा कार्यक्रम